Mother of All Deals : भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (FTA) बद्दल जागतिक स्तरावर तीव्र चर्चा सुरू आहे. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी त्याचे वर्णन “Mother of All Deals” असे केले. तसेच ती फक्त सुरुवात आहे.भारत-ईयू धोरणात्मक भागीदारी भविष्यात अधिक मजबूत होईल असे म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराचे वर्णन दोन्ही प्रदेशांसाठी महत्त्वपूर्ण संधी उघडणारे असल्याचेही केले. “भारत – युरोप आज इतिहास घडवत आहेत” युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “आज, युरोप आणि भारत इतिहास घडवत आहेत. आम्ही ‘सर्व करारांची जननी’ पूर्ण केली आहे. दोन अब्ज लोकांसाठी एक मुक्त व्यापार क्षेत्र तयार केले गेले आहे, ज्याचा दोन्ही बाजूंना फायदा होईल. ही फक्त सुरुवात आहे. आम्ही आमची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करू.”असे म्हटले. पंतप्रधान मोदींकडून FTA वर स्वाक्षरीची घोषणा Mother of All Deals : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरीची घोषणा केली. “भारतीय ऊर्जा सप्ताह” ऑनलाइन संबोधित करताना ते म्हणाले, “मी तुम्हाला एका महत्त्वाच्या घडामोडीबद्दल सांगत आहे. Mother of All Deals : काल भारत आणि युरोपमध्ये एक मोठा करार झाला.” पंतप्रधानांनी या कराराबद्दल सर्वांना अभिनंदन केले आणि सांगितले की जगभरात याला “सर्व करारांची जननी” म्हटले जात आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की हा भारत-ईयू करार जागतिक जीडीपीच्या अंदाजे २५% आणि जागतिक व्यापाराचा एक तृतीयांश भाग व्यापतो. ते म्हणाले की हे जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील सहकार्याचे एक उत्तम उदाहरण आहे. १.४ अब्ज भारतीयांसाठी नवीन संधी Mother of All Deals : पंतप्रधान म्हणाले की हा करार केवळ युरोपसाठीच नव्हे तर १.४ अब्ज भारतीयांसाठी नवीन संधी निर्माण करेल. त्यांनी सांगितले की हा करार यूके आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटने (EFTA) सोबत झालेल्या व्यापार करारांना पूरक ठरेल, जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळी मजबूत करेल. उत्पादन आणि सेवा क्षेत्रांना मोठी चालना पंतप्रधान मोदी म्हणाले की हा मुक्त व्यापार करार भारताच्या उत्पादन क्षेत्राला एक नवीन चालना देईल आणि सेवा क्षेत्राचा विस्तार देखील करेल. त्यांनी विशेषतः कापड, रत्ने आणि दागिने, चामडे आणि पादत्राणे यासारख्या क्षेत्रातील तरुण आणि व्यावसायिक नेत्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी सांगितले की, या करारामुळे जगभरातील व्यवसाय आणि गुंतवणूकदारांचा भारतातील विश्वास आणखी दृढ होईल. त्यांनी यावर भर दिला की भारत आज प्रत्येक क्षेत्रात जागतिक भागीदारीसह पुढे जात आहे. हेही वाचा : India-EU FTA Deal : भारत-EU मध्ये मोठा करार ! पंतप्रधान मोदींनी केल्या सह्या ; घोषणा करत म्हणाले,”हा करार जगातील”