#Wari2019 : दिव्यांग लेकरासाठी माय-बापच ‘श्रावण’बाळाच्या भूमिकेत!

पुणे – आळंदी ते पंढरपूर अशी वारी वृद्ध आई वडील आपल्या अपंग मुलाला घेऊन करत आहेत. जालिंदर बाबू गोरे, केराबाई जालिंदर गोरे असे या वृद्ध माता पित्यांचे नाव आहे. मुलगा अंपग असल्याने खचून न जाता त्याला संभाळत हे वृध्द आईवडील स्वत: भाजीपाल्याचा व्यवसाय करून संसार करत आहेत. त्यांना शासनाकडून कोणताही लाभ मिळत नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले, असे असूनसुध्दा ते आपल्या अपंग मुलासह गेली 20 वर्षे ते न चुकता आळंदी ते पंढरपुर अशी वारी करत आहेत.

बाळू जालिंदर गोरे असे अपंग मुलाचे नाव आहे. ते विवाहित असून गेल्या 25 वर्षापासून दिव्यांग आहेत. ते म्हणाले की, माझे आई-वडील मला लहानपणापासून वारीला नेतात. वारीमुळेच मला जगण्याची आशा मिळाली, आणि आज मी त्यामुळेच जीवनात सुखी आहे. तसेच माझे आई वडील हे माझ्यासाठी पांडुरंग असल्याचे बाळू यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.