टोकियो – सुसंस्कृत जगामध्ये विवाह ही एक सामाजिक व्यवस्था आहे आणि लग्नगाठी नेहमी स्वर्गात बांधल्या जातात अशा प्रकारचा विचारही नेहमी व्यक्त केला जातो पण आधुनिक जगामध्ये मात्र, अनेक देशांमध्ये तरुण मुली लग्न करण्यास उत्सुक दिसत नाहीत जपानमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवाला प्रमाणे जपानमधील बहुतांशी मुलींना लग्न नको वाटत आहे. लग्नानंतर आपल्या स्वातंत्र्यावर मर्यादा येतील आणि आपले करियर गमावले जाईल अशी भीती त्यांना वाटत असल्याने अनेक महिला लग्न करण्यास तयार नाहीत जपान सरकारने नुकताच आपला जेंडर रिपोर्ट 2022 जाहीर केला,
असून या अहवालातील माहितीप्रमाणे वयाची तिशी ओलांडलेल्या 25 टक्के महिलांना लग्न करायचे नाही तर वीस ते तीस या वयोगटातील 14 टक्के महिला लग्न करण्यास तयार नाहीत लग्नानंतर एका नवीन आयुष्यला सुरुवात होती पण आपल्या आयुष्य आपल्या पार्टनरच्या हातात नियंत्रित होत असल्याने या महिलांना अशा प्रकारचे कोणतेही नियंत्रण आपल्या आयुष्यावर नको आहे. लग्नानंतर महिलेचे अस्तित्व संपून जाते असे जपानमधील अनेक महिलांना वाटते नाव बदलण्यापासून सर्वच गोष्टी बदलत असल्यामुळे अनेक महिलांना आपले व्यक्तिमत्व संपते की काय अशी भीती वाटते म्हणूनच त्या लग्नाला तयार होत नाहीत.
लग्नानंतर जेव्हा मुलेबाळे होतात तेव्हा नोकरी आणि संसार हे दोन्ही सांभाळणे अनेक महिलांना तारेवरची कसरत वाटते म्हणून कोणता तरी एकच पर्याय स्वीकारावा अशी मानसिकता जपानमधील महिलांची तयार झाली आहे. जपानप्रमाणेच कॅनडा आणि चिली या देशांमधील महिला सुद्धा लग्न करण्याबाबत दिवसेंदिवस जास्त उदासीन होत चालल्या आहेत भारतातही अशाच प्रकारचा ट्रेंड विकसित होत असल्याचे संकेत या अहवालात देण्यात आले आहेत.