मोस्ट वॉन्टेड रिव्हॉल्वर तस्कर मनीष नागोरी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर – मोस्ट वॉन्टेड रिव्हॉल्वर तस्कर मनीष नागोरीला कोल्हापूरच्या स्कायलार्क हॉटेल मधून शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस अधीक्षकअभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार पहाटे ४ वाजता शाहूपुरी पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. मोस्ट वॉन्टेड नागोरीवर पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरात 20 रिव्हॉल्वर तस्करीचे आणि खुनाचे 4 असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मोस्ट वॉंटेड रिव्हलवर तस्कर मनीष नागोरी हा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी परिसरात होणार आहे. यापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरणात रिव्हलवर पुरावल्याचा त्याच्यावर पोलिसांना संशय होता. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक देखील केली होती. यानंतर कोल्हापूर पोलिसांनी मनीष नागोरीला तडीपार केल होत. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर चे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांना मनीष नागोरी हा हॉटेल स्कायलार्क इथं आल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक पवन मोरे, फौजदार संदीप जाधव, अशोक पाटील, सागर माळवे यांच्यासह 10 ते 12 पोलिसांनी हॉटेल स्कायलार्क धाड टाकून नागोरी याला ताब्यात घेतलं . त्याच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम 142 नुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आज दुपारी नागोरीला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दरम्यान , शाहूपुरी पोलिसांनी नागोरीची चौकशी सुरू केली असून नागोरी कडून आणखी रिव्हॉल्वर मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.