मोस्ट वॉण्टेड गॅंगस्टर रवी पुजारीला अटक

मुंबई – खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आदी बऱयाच गंभीर गुन्हयांत सहभागी असलेला व गेल्या दोन दशकांपासून मुंबईसह साऱया देशभरातील पोलिसांना हुलकावणी देणाऱया रवी पुजारी या मोस्ट वॉण्टेड गुंडाला पश्‍चिम आफ्रिकेतील सेनेगलमधून ‘रॉ’ या केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने बंगलोर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आदी राज्यांतील व्यावसायिकांना मोठया प्रमाणात परदेशातून खंडणीसाठी धमकावणाऱया रवी पुजारीला गेल्या वर्षी सेनेगलमध्ये दाढी करताना अटक करण्यात आली होती, परंतु जामिनावर सुटलेल्या रवी पुजारीने त्यानंतर पलायन केले होते. अखेर हिंदुस्थानच्या केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने कर्नाटक पोलिसांनी त्याला नुकतीच अटक केली आहे.

दरम्यान, गेल्या 15 वर्षात रवी पुजारीविरोधात अनेक देशांमध्ये अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत. याआधी तो ऑस्ट्रेलियात लपला असल्याची शक्‍यता वर्तवली जात होती. तेथूनच तो मुंबईत आपल्या हस्तकांमार्फत टोळी चालवत असल्याचे सांगितले जात होते. रवी पुजारीने सध्या अटकेत असलेल्या छोटा राजनसोबतही काम केले आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये छोटा राजनचं इंडोनेशियामधून प्रत्यार्पण करण्यात आले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.