2019मध्ये तारा सुतारियाला केले गेले सर्वाधिक सर्च

मुंबई : बॉलिवुडमध्ये 2019 हे वर्ष काही जणांसाठी खूपच खास ठरले आहे. यात काही स्टार्सची नावे कॉन्ट्रोवर्सीजशी जोडले गेले तर काही जण इतर कारणांमुळे चर्चेत राहिली.

यात इंडस्ट्रीजमधील काही नवीन चेहरेही आहेत. दरम्यान, गुगलने 2019मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्यांची यादी जाहीर केली असून यात काही बॉलिवुडमधील कलाकारांचीही नावे आहेत. बॉलिवुडमधील सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्यांमध्ये तारा सुतारियाचे नाव आघाडीवर आहे.

या यादीत तारा 8व्या स्थानी असून तिच्याशिवाय लता मंगेशकर यांचेही नाव या यादीत आहे. तारा सुतारियाने “स्टूडेंट ऑफ द इयर-2′ या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीजमध्ये पाउल ठेवले होते. यात तिच्यासोबत टायर श्रॉफने मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अनन्या पांडेनेही डेब्यू केले होते.

ताराने चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी टेलिव्हिजनवर काम केलेले होते. आतापर्यत ती दोन चित्रपटात झळकलेली आहे. “स्टुडेंट ऑफ द इयर’नंतर तिने “मरजावा’ चित्रपटात एका मुक मुलीची भूमिका साकारली होती.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.