पुणे – पुणे महापालिका हद्दीत सर्वाधिक ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली असून, राज्यात रविवारी 50 ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे महापालिका हद्दीतील बाधितांची संख्या 49 झाली असून, राज्यात ओमायक्रॉन बाधितांमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर गेले आहे. तर सांगलीचा नव्याने समावेश झाला आहे. राज्यातील एकूण बाधित संख्या रविवारी 510 झाली आहे.
रविवारी नोंद झालेल्या 50 बाधितांमधील 38 बाधित “आयसर’ संस्थेने तर 12 रुग्ण “राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र’ (एनसीसीएस) ने रिपोर्ट केले आहेत.
यात पुणे मनपा- 36, पिंपरी-चिंचवड- 8, पुणे ग्रामीण- 2, सांगली 2, ठाणे आणि मुंबई प्रत्येकी 1 अशी नोंद झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत बरे झालेल्या 193 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दि. 1 नोव्हेंबरपासून आजपर्यंत 2 हजार 284 सॅम्पल जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यातील 134 अहवाल प्रलंबित आहेत.
एकूण बाधित संख्या
मुंबई – 328, पुणे मनपा – 49, पिंपरी-चिंचवड – 36, पुणे ग्रामीण – 23, ठाणे मनपा – 13, नवी मुंबई, पनवेल – प्रत्येकी 8, कल्याण-डोंबिवली – 7, नागपूर आणि सातारा – प्रत्येकी 6, उस्मानाबाद – 5, वसई विरार – 4, नांदेड – 3, औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी, निजामपूर, मनपा, मीरा भाईंदर, सांगली – प्रत्येकी 2, लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर – प्रत्येकी 1