पुणे : हिवाळी हंगाम सुरू झाला आणि विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली. त्यामुळे लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रविवारी (दि. ८) दिवसातील सर्वाधिक १०२ उड्डाणे झाली. या आधी एका दिवसात सर्वाधिक १०० उड्डाणे झाली होती.
पुणे विमानतळावरून आतापर्यंत दिवसाला साधारण १९० ते १९६ विमानांची ये-जा सुरू होती. त्यामधून साधारण ३० ते ३२ हजार प्रवासी प्रवास करतात. उन्हाळी हंगाम तसेच सप्टेंबर २०२४ मध्ये दोन वेळा एकाच दिवसामध्ये १०० उड्डाणे झाली होती. तर, १०० विमाने पुण्यात आली. हिवाळी हंगामध्ये पुणे विमानतळाला रविवार ते सोमवार दरम्यान विमानासाठी २१७ स्लॉट दिलेले आहेत. पण, त्याचा वापर विमान कंपन्यांकडून केला जात नव्हता.
प्रवाशांच्या सोईसाठी विमान कंपन्यांनी जास्तीत जास्त स्लॉटचा वापर करावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच, नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या देखील वाढली. त्यामुळे रविवारी पुणे विमानतळावरून सर्वाधिक उड्डाणे झाली.
नवीन टर्मिनलमुळे प्रवाशांना अधिक आणि जलद सुविधा दिल्या जात आहेत. तसेच, हिवाळी हंगामध्ये देशांतर्गत नवीन शहरे जोडण्यात आली. प्रामुख्याने भोपाळ, इंदोर, गोवा आदी. तसेच उडाण योजने अंतर्गंत सिंधूदुर्ग, नांदेड, जळगाव ही शहरे जोडण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. विमान कंपन्यांकडूनही जास्तीत जास्त स्लॉट वापरण्यात येत आहेत.
संतोष ढोके – संचालक, पुणे विमानतळ