2020 मध्ये क्षयरोगाने सर्वाधिक मृत्यू

करोना महामारीच्या काळात उपचाराकडे झाले दुर्लक्ष
न्यूयॉर्क :
जागतिक आरोग्य संघटनेने आपला क्षयरोग संदर्भातील वार्षिक अहवाल जाहीर केला असून त्यातील काही निष्कर्ष धक्कादायक आहेत. गेल्या दहा वर्षात प्रथमच 2020मध्ये क्षय रोगाने मृत्यू पावलेले यांचे प्रमाण वाढले आहे. करोना महामारीच्या काळात उपचाराकडे दुर्लक्ष झाल्याने हा प्रकार घडला असल्याचे आरोग्य संघटनेच्या या अहवालात म्हटले आहे.

2020 या एका वर्षात क्षयरोगाने 15 लाख लोकांचा बळी गेला असून त्यापैकी पाच लाख लोकांचा बळी एकट्या भारतात गेला आहे. 2019 या वर्षाच्या तुलनेत क्षय रोगाने मृत्यू झालेले यांचे प्रमाण 13 टक्केने वाढले आहे. त्याचे महत्त्वाचे कारण या कालावधीत पसरलेल्या करोना महामारीमुळे क्षयरोगाच्या उपचारांकडे दुर्लक्ष झाले.

सध्या जगभरात एक कोटी पेक्षा जास्त लोक क्षय रोगाने त्रस्त असून त्यापैकी 11 लाख लहान मुले आहेत. सर्वात जास्त रुग्ण भारत इंडोनेशिया दक्षिण आफ्रिका पाकिस्तान या देशांमध्ये आढळतात जागतिक आरोग्य संघटनेने 2015 ते 2020 या पाच वर्षांच्या कालावधीत क्षयरोगाने मृत्यूचे प्रमाण 35 टक्केने कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

पण हे उद्दिष्ट फक्त नऊ टक्केच पूर्ण झाले महामारीच्या काळात क्षयरोगाने मरण पावले यांचे प्रमाण वाढत असले तरी क्षय रोगाने बाधित होणाऱ्यांची संख्या मात्र कमी झाली आहे. 2019 आणि 2020 या कालावधीमध्ये क्षय रोगाने बाधित होणाऱ्यांचे प्रमाण तब्बल चाळीस टक्‍क्‍याने घटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.