मोशी न्याय संकुलात पहिल्या टप्प्यात उभारणार 25 न्यायालये

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी मोशी येथील न्याय संकुलात पहिल्या टप्प्यामध्ये तीन मजली इमारत उभी राहणार असून त्यामध्ये एकूण 25 न्यायालये उभारली जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारतीसाठी मोशी-बोऱ्हाडेवाडी येथे 17 एकर जागा आरक्षित आहे. ही जागा नवनगर विकास प्राधिकरणाकडून 2014 मध्ये जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. इमारतीच्या बांधकामासाठी शासनाकडून 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पाश्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवडसाठी 9 मजली न्यायसंकुल इमारत उभारणीचा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायलयाकडे सादर करण्यात आला होता.

या प्रस्तावामध्ये उच्च न्यायालयाकडून पहिल्या टप्प्यामध्ये तीन मजल्यामध्ये 25 न्यायालये व त्यास अनुसरून निवासस्थाने बांधकामाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सीबीआयचे विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी दिले. न्यायसंकुल येथे 12 कनिष्ठ स्तरचे दिवाणी न्यायाधीश व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांची न्यायालये, 7 वरिष्ठ स्तराचे दिवाणी न्यायाधीशांची न्यायालये व 6 अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायाधीशांची न्यायालये व त्यांच्यासाठी तितकीच आवश्‍यक निवासस्थाने बांधण्याचा आराखडा उप मुख्य वास्तूशास्तज्ञ यांच्याकडून प्राप्त करून घ्यायचा आहे. तसेच त्याचे अंदाजपत्रक व नकाशे तयार करून ते तातडीने सादर करण्याचे आदेशही न्यायाधीश भगुरे यांनी दिले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.