मोशी कचरा डेपो चोवीस तास राहणार सुरू

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील गोळा केलेला कचरा मोशी डेपोपर्यंत वाहून नेण्याचे काम आता अहोरात्र सुरू राहणार आहे. त्यामुळे या वाहनांच्या फेऱ्या मोशी डेपोपर्यंत दिवसरात्र सुरु राहणार आहेत. केवळ कचरा वाहतूक कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.

स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांनी मंगळवारी (दि. 29) कचरा संकलन आणि वहन ठेक्‍याबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कचराकुंड्या आणि कचरा विलीनीकरण केंद्रात जमा झालेला कचरा मोशी कचरा डेपो येथे वाहून नेण्यासाठी महापालिकेकडे सध्या विविध प्रकारची एकूण 350 वाहने आहेत. तरीही या वाहनांमार्फत दिवसभरात कचरा उचलणे शक्‍य होत नाही.

ही बाब लक्षात घेऊन कचरा गोळा करण्याचे कामकाज रात्रपाळीतही सुरू ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.शहरातील कचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होण्यासाठी मोशी कचरा डेपो येथे सुमारे 81 एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. शहरात प्रति दिन सुमारे 811.1 टन कचऱ्याची निर्मिती होते. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातून वाहनांद्वारे घनकचरा मोशी डेपोत आणला जातो.

रहिवाशांना रात्रभर वर्दळीचा त्रास
भोसरी, मोशी भागातील रस्त्यांवर दिवसभर कचरा वाहतुक करणाऱ्या वाहनांची सतत रेलचेल सुरू असते. आता रात्रपाळीतही कचरा गोळा करण्याचे काम सुरू राहणार आहे. याचा परिणाम पुणे-नाशिक महामार्ग, स्पाईन रोडलगतच्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here