मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2021 मध्ये मराठी चित्रपटाने बाजी मारली आहे. “पगल्या’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट भाषा फिचरचा पुरस्कार पटकावला आहे.
विनोद सॅम पीटर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ते म्हणाले, मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारख्या ठिकाणी माझ्या चित्रपटाला सन्मानित केले जाणे ही माझ्यासाठी आणि आमच्या टीमसाठी अत्यंत आनंदाची घटना आहे. या चित्रपटाचे कथानक हा दोन मुलांच्या भावविश्वाची गुंफण करतो.
मुलांमध्ये असलेल्या निरागसतेवर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटात नायक म्हणून आढळणारी दोन मुलं ऋषभ, दत्ता आणि त्यांच्यासोबत असलेले कुत्र्याचे पिलू कथानक पुढे सरकवत राहतात. त्यातही या दोन मुलांपैकी एक मुलगा हा गावात राहणारा तर दुसरा शहरातील असतो. भारतात सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे हा चित्रपट भारतात अद्याप प्रदर्शित झाला नाही.