मोर्टार शेल भारतीय जवानांकडून निष्प्रभ

श्रीनगर : शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याकडून फेकण्यात आलेले 120 एमएम आकाराचे 9 मोर्टार शेल भारतीय जवानांनी निष्प्रभ केले आहेत. हे सर्व मोर्टार बालाकोट, बसोनी आणि संडोट या गावांच्या परिसरात फेकण्यात आले होते. हे सर्व मोर्टार शेल भारतीय सीमेत येऊन पडल्यावर त्यांचा स्फोट झाला नव्हता, मात्र त्यांचा स्फोट होण्याची शक्‍यता होती. तत्पूर्वीच भारतीय जवानांनी हे सर्व मोर्टार निष्प्रभ केले.

या अगोदर कठुआ जिल्ह्यातील हिरानगर येथील सीमा परिसर अशांत होता. पाकिस्तानकडून बुधवारी पहाटे साडेचार वाजेच्यासुमारास शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारताच्या दोन चौक्‍यांवर हल्ला केला होता. यानंतर सकाळी साडेदहा व दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोन मोर्टार फेकले होते. यामुळे परिस्थिती बिघडण्याची शक्‍यता निर्माण झाली होती.
पाकिस्तान एलओसीवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे.

भारतीय सेनेकडून दावा करण्यात आलेला आहे की, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सीमारेषेजवळील पाकिस्तानी चौक्‍यांजवळ पाकिस्तानचे एसएसजी कमांडो आढळले होते. तसेच पुंछ जिल्ह्यातील केजी सेक्‍टरमधील पुलस्त नदी परिसरातील एका चौकीजवळही काही पाकिस्तानी एसएसजी कमांडो दिसले होते, तेव्हा त्यांना पिटाळून लावण्यात आले होते. घटनास्थळी काही अद्यावत सामान देखील आढळून आले शिवाय एका गुप्त कॅमेऱ्यातही या पाकिस्तानी कंमांडोची छायाचित्रं दिसली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)