“पंचतारांकित दांडिया’ महोत्सवाच्या यशस्वी नियोजनावरून बारामतीकरांनी थोपटली पाठ
बारामती- नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात दैनिक “प्रभात’ व आर. जे. सायकल स्टुडिओ यांच्या वतीने रविवारी (दि. 6) “पंचतारांकित भव्य दांडिया’ महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. या उत्सावाला स्पर्धकांसह बारामतीकारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
दरम्यान, बारामतीत प्रथम आयोजित लाईव्ह बॅंडचे यशस्वी आयोजन व शिस्तबद्ध नियोजन केल्याबद्दल बारामतीकरांकडून दैनिक “प्रभात’ व आर. जे. सायकल स्टुडिओची पाठा थोपटली असून, अद्यापही कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शहरातील भिगवण रस्त्यावरील जयश्री गार्डन येथे सायंकाळी 6 वाजता सुरू झालेला उत्सव रात्री 10 च्या ठोक्याला बंद करून आयोजकांनी शिस्तचा उत्कृष्ट नमुना सर्वांसमोर ठेवला. उत्सव साजरा करताना त्याचा प्रशासनासह सामन्य नागरिकांना देखील कसलाही त्रास होणार नाही, याची उत्तम व्यवस्था दैनिक “प्रभात’ व आर. जे. सायकल स्डुडिओच्या वतीने करण्यात आली होती.
याबाबत आर. जे सायकल स्डुडिओचे सर्वेसर्वा राहुल मच्छिंद्र जगताप (ढाकाळकर) म्हणाले की, बारामतीत अतापर्यंत फक्त डिजेवरच दांडिया उत्सव रंगत होता. “लाईव्ह बॅंड’वर फक्त पुणे आणि मुंबईमध्येच दांडिया स्पर्धा घेतल्या जात होत्या. मात्र, यंदा बारामतीत काहीही करून लाईव्ह बॅंडवर दांडिया स्पर्धा घेण्याचे ठरवले होते. त्याचे नियोजन सुरू होते. त्यातच दैनिक “प्रभात’ने मोलाचा हात देत “प्रायोजकत्व’ स्वीकरल्याने स्पर्धा निश्चितच यशस्वी होणार याची खात्री असल्याने त्यादृष्टीने जोमाने कामाला लागले.
या उत्सवावर पावसाचे सावट असल्याने दांडिया साजरा होणार की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, काहीही करून दांडिया स्पर्धा घेण्याचा संकल्प दैनिक “प्रभात’ व आर. जे. सायकल स्टुडिओने सोडला होता. दरम्यान, स्पर्धेचे ठिकाण असलेल्या जयश्री गार्डनजवळ निवारा कुठेच नव्हता, गार्डन समोर हॉल होता, त्यामध्ये नवीन हजारो गाड्यांचा स्टॉक होता आणि तो हलवणे अवघड काम होते; पण आमचे मित्र व जयश्री गार्डनचे मालक शितल सराफ यांनी संपूर्ण हॉल मोकळा करून दिल्याने दांडिया “बंदिस्त हॉल’मध्ये रंगणार होता. ज्या पद्धतीने गार्डनमध्ये म्युझिक सिस्टिमची सोय केली होती त्याच पद्धतीच्या सोयी-सुविधा हॉलमध्ये केल्या होत्या, त्यामुळे स्पर्धकांचा उत्साह दुणावला होता.
दरम्यान, स्पर्धेत पावसाचे कोणतेही विघ्न आले नाही अन् स्पर्धा मोकळ्या मैदानात जल्लोषात साजरी काण्यात आली. यात प्रायोजक दैनिक “प्रभात’सह जेबीएस रोहित सराफ, रिलायन्स स्मार्ट, बारामती सायकल क्लब, वैष्णवी ग्राफिक, शाम रोजेस यांच्यासह अक्षय शिंदे, निखिल जगताप, इशान पराडकर, शुभम पवार, विश्वजीत कदम, नीलेश घोडके, सागर जाधव, दीपक बर्गे आदींचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे जगताप यांनी नमूद केले.
- महिलांकडून आयोजकांना विशेष “दाद’
या दांडिया महोत्सवात महिला, मुली आणि कपल यांच्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली होती, त्यामुळे महिलांच्या मनात सुरक्षिततेची भावना होती. त्यामुळे त्यांनी दांडिया खेळण्याचा मनमुरादपणे आनंद लुटल्याची भावना अनेक महिला, तरुणी, कपल्स यांनी “सोशल मीडिया’द्वारे कळवून आयोजकांना विशेष “दाद’ दिली.
- दैनिक “प्रभात’ने याच पद्धतीने कायम साथ दिली तर बारामतीत आणखी नवनवे उपक्रम राबले जातील, तसेच बारामतीतकरांना नवनवीन उपक्रम अनुभवण्याची संधी मिळेल. पंचतारांकित दांडियात स्पर्धेचा एक कोटी रुपयांचा इन्श्युरन्स उतरवण्यात आला होता. दांडिया महोत्सवात कोणतीही अप्रिय घटना घडली असती तर ती या इन्श्युरन्सद्वारे सांभाळण्यात आली होती. मात्र, यशस्वी नियोजनामुळे अशी कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. महोत्सवादरम्यान गार्डनमध्ये रुग्णवाहिका आणि डॉक्टरही तैनात करण्यात आले होते. या सोयी-सुविधांमुळे दैनिक “प्रभात’ व आर. जे. सायकल सुडिओला बारामतीकरांकडून अद्यापही कौतुकाची थाप मिळत आहे.
– राहुल जगताप (ढाकाळकर), सर्वेसर्वा, आर. जे सायकल स्डुडिओ, बारामती