मॉरीन्हो यांना वाटते मँचेस्टर युनाइटेडच्या भविष्याची भीती…

जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉल क्लबपैकी एक मँचेस्टर युनाइटेड क्लबचे प्रशिक्षक होजे मॉरीन्हो यांना पुढील मोसमाच्या सुरुवातीसंबंधी भीती वाटते आहे. नवीन मोसमाच्या अगोदर युनिटेडचा संघ इंटरनॅशनल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्री- सिजन सामने खेळात आहे. या सामन्यांमध्ये संघाची कामगिरी लौकिकास साजेशी होत नसल्याने त्यांना अशी भीती वाटते आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झालेल्या चार सामन्यांमध्ये युनाइटेडच्या संघाने केवळ एका सामन्यात विजय प्राप्त केला आहे आणि तोही पेनल्टी शूटआऊटमध्ये. तर एका सामन्यात  त्यांना इंग्लिश प्रीमियर लीगमधील मुख्य प्रतिस्पर्धी संघ लिव्हरपूल विरुद्ध ४-१ अश्या गोलाच्या फरकाने पराभव पत्करावा लागला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या स्पर्धेत मँचेस्टर युनाइटेडचा संघ आपल्या काही मुख्य खेळाडूंच्या शिवाय उतरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)