राज्यात ‘एमटीडीसी’ बांधणार आणखी पाच रिसॉर्ट

पुणे – पर्यटकांना अधिकाअधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून राज्यात आणखी पाच ठिकाणी सुसज्ज रिसॉर्ट बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी पर्यटन क्षेत्रांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने पर्यटनाच्या ठिकाणी अधिक सुविधा देण्यात आल्या आहेत. या दर्जेदार सुविधांमुळे महामंडळाचे बुकिंग दर सुट्ट्यांना फुल्ल होत आहे. विशेष म्हणजे पर्यटनाच्या ठिकाणी खासगी हॉटेल आणि अन्य सुविधा महाग मिळत असल्याने आणि त्यांचा दर्जाही चांगला नसल्याने या पर्यटकांनी महामंडळाच्या रिसॉर्टना सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामुळेच ही पर्यटन क्षेत्रे आणि महामंडळाची रिसॉर्ट फुल्ल होत आहेत. त्यातूनच पर्यटक नाराज होत आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी महामंडळाच्या वतीने या पर्यटनाच्या ठिकाणी स्थानिक खासगी ठेकेदारांना निवास आणि न्याहारी केंद्रे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याचा पर्यटकांना लाभ होत असला तरीही हंगामामध्ये ही केंद्रेही अपुरी पडू आहेत. त्यामुळे त्यावर मार्ग काढण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार आगामी काळात पर्यटकांच्या सोयीसाठी राज्यभरात आणखी पाच रिसॉर्ट बांधण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे, अशी माहिती महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.