नवी दिल्ली – देशात काल प्रथमच एकाच दिवसात 9 लाखाहून अधिक कोविड चाचण्या घेण्यात आल्या. गेल्या 24 तासांत 9 लाख 18 हजार 470 कोविड चाचण्या करण्यात आल्या. दररोज 10 लाख नमुने तपासण्या करण्याच्या दिशेने ही आश्वासक कामगिरी आहे. या कामगिरीमुळे एकूण चाचण्यांची संख्या 3.25 कोटींपेक्षा जास्त झाली आहे.
या कामगिरीमुळे प्रति दहा लाख लोकसंख्येमागे चाचण्यांची संख्या झपाट्याने वाढून 23,668 झाली आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे.
नियमितपणे वाढणाऱ्या चाचण्यांमुळे बाधित रुग्णांच्या दरात कमालीची घट झाली आहे. मोठ्या संख्येने चाचण्या घेण्यात आल्यामुळे सुरुवातीला बाधित रुग्णांचा दर वाढेल, राष्ट्रीय सरासरी 8 टक्क्यांपेक्षा कमी झाली असून, असे 26 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी दर नोंदवला गेला आहे.
वैज्ञानिक प्रयोगशाळांच्या राष्ट्रीय नेटवर्कमध्येही सातत्याने वाढ होत असून सरकारी क्षेत्रात 977 प्रयोगशाळा आणि 517 खासगी प्रयोगशाळा असून आज एकूण प्रयोगशाळांची संख्या 1,494 पर्यंत वाढली आहे.