फिलिपाईन्समधील चर्च बॉंबस्फोटांत 21 ठार 71 पेक्षा अधिक जखमी

मनीला (फिलिपाईन्स) : फिलिपाईन्समधील चर्च बॉंबस्फोटांत 21 ठार 71 पेक्षा अधिक जखमी झाल्याचे माहिती पोलीसांनी दिली आहे. रविवारी सकाळी दक्षिण फिलिपाईन्समधील बेट जोलो येथील रोमन कॅथॉलिक कॅथेड्रल, अवर लेडी ऑफ कार्मेलिनच्या आतील भागात एक आणि बाहेरील बाजूस एक असे दोन बॉंबस्फोट झाले. स्फोटांनंतर मृतदेह रस्त्यावरही पसरले होते. या बॉंबस्फोटांची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. मदत आणि बचाव कार्य चालू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आलेली आहे.

पहिला बॉंबस्फोट झाल्यानंतर सुरक्षा अधिकारा घटनास्थळी पोहचले, त्यानंतर दुसरा बॉंबस्फोट झाल्याची माहिती फिलिपाईन्सचे राष्ट्रीय पोलीस प्रमुख ऑस्कर अलबयाल्दे यांनी दिली आहे. मृतांमध्ये नागरिकांचा, त्याचप्रमाणे पोलीसांचाही समावेश आहे. गंभीर जखमींना विमानाने जमबोआंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जोलो ही सुलू प्रांताची राजधानी आहे. अबू सय्यद गट आणि अन्य दहशतवादी या भागात सक्रिय आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या दोन बॉंबस्फोटांनंतर सर्वत्र अति दक्षतेचा इशारा देण्यात आला असून सर्व धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकांणांचा सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याचे संरक्षण सचिव डेल्फिन लॉरेंजाना यांनी सांगितले आहे.
अध्यक्ष रॉड्रिगो ड्यूटेर्ट यांचे प्रवक्ते साल्वाडोर पॅनेलो यांनी या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)