देशात 24 तासात देशात कोरोनाचे 45 हजारापेक्षा जास्त नवीन रुग्ण

नवी दिल्ली : दिवाळीनंतर देशात कोरोनाने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 45,209 नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत, कोरोनाचे 43,493 रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात एकूण रूग्णांची संख्या 90,95,806 वर पोचली आहे. सध्या 4,40,962 रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत. आतापर्यंत 85,21,617 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्णांचा बरे होण्याचं प्रमाण 93.69% आहे.

देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1,33,227 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्गाविरूद्ध लसची अपेक्षा वाढली आहे. कोरोना विषाणूविरूद्ध देशातील संपूर्ण देशी लस (व्हॅक्सीन ट्रायल) चा तिसरा टप्पा चालू आहे. यासह, लस वितरित करण्याचे धोरण देखील तयार केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या लसीसंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली असून त्यामध्ये लस वितरित करण्यापासून ते साठविण्यापर्यंत रणनीती तयार केली गेली.

शुक्रवारी हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी लसीच्या चाचण्याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी स्वत: वॅक्सीनचा ट्रायल घेतला. आता देशाला नवीन वर्षाची प्रतीक्षा आहे. नवीन वर्षात लोकांना लस मिळू शकेल. इंडिया बायोटेक-आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफव्हायरोलॉजी कंपनी एकत्र कोरोनावर वॅक्सीन शोधण्याचं काम करत आहेत. वॅक्सीन तिसर्‍या टप्प्यातील चाचणीत आहे. देशातील 22 केंद्रांवर लसीचा तिसरा टप्पा घेण्यात येत असून त्यामध्ये सुमारे 26 हजार स्वयंसेवक सहभागी होत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.