बर्लिन : सध्या टेनिसमध्येही जोरदार सट्टा लावला जात असल्याचे वृत्त समोर आले आहे. या प्रकरणात एटीपी क्रमवारीत अव्वल ३० मध्ये असलेल्या एका खेळाडूसह १३५ हून जास्त टेनिसपटूंचा सट्टेबाजीत सहभाग असल्याची माहिती जर्मन प्रसारमाध्यमांनी दिली.
अव्वल ३० मधील एक असलेल्या खेळाडूने तीन एटीपी टूरचे विजेतेपद पटकावले आहे. याव्दारे टेनिसपटूंना लढती फिक्स करण्याचे आमिष दाखविले जात असल्याचेही समोर आले आहे. यात शंभरपेक्षा जास्त सट्ट्यांचा समावेश असून यात प्रत्येक प्रकरणात लाखो युरोची कमाई आहे.
अर्जेंटीनाच्या एका माजी खेळाडूनी दावा केला आहे की, सट्टेबाजानी त्याच्याशी संपर्क केला होता. त्याने म्हटलं आहे की, जागतिक क्रमवारीत टाॅप ५० मध्ये असलेल्या काही खेळाडूनीी देखील मॅच फिक्स केल्या आहेत. हे सर्व स्तराच्या स्पर्धेत होत असल्याच त्याने म्हटल आहे.