दिलासादायक ! जगात 27 लाखांहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात

मुंबई :  जगात सध्या  कोरोनाचे जवळपास 61 लाख रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात जगात जवळपास दीड लाख नवीन कोरोना  रुग्ण आढळून आले आहेत, तर 24 तासात 4,454 जणांचा बळी कोरोनामुळे  गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 27 लाख 34 हजार रुग्ण बरे झाले आहेत.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण  61 लाख 53 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 3 लाख 70 हजार 870 वर पोहोचली आहे.
याच आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात दहाव्या स्थानावर आहे. भारतात कोरोनाचे  1 लाख 81 हजार रुग्ण आहेत. तर 5185 बळी कोरोनामुळे गेले आहेत. सध्या भारतात 90,320अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 86,984 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

 जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 18 लाख 16 हजार 820 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 1 लाख 5 हजार लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 38 हजार 376 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 72 हजार 826 इतकी आहे.

अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनाबाधितांच्या आकड्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. ब्राझीलमध्ये 499,966 कोरोनाबाधित आहेत तर 28 हजार 849 लोकांचा मृत्यू झालाय.  स्पेनमध्ये  कोरोनामुळे 27125 लोकांचा मृत्यू झाला आहे.

2 लाख 86 हजार लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत  33 हजार 340 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 32 हजार इतका आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.