श्रीलंकेत आणखी दहशतवादी हल्ल्यांचा इशारा

कोलोंबो – श्रीलंकेमध्ये इस्टरच्या दिवशी झाल्याप्रमाणे भीषण आत्मघातकी हल्ले करणाऱ्या कट्टरवादी जिहादी गटाचे आणखी सदस्य सक्रिय आहेत. त्यामुळे असेच आत्मघातकी हल्ले यापुढच्या काळातही केले जाऊ शकतात, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. श्रीलंका सरकारच्या विनंतीनुसार अमेरिकेच्या संरक्षण तज्ञांनी श्रीलंकेच्या गुप्तचर विभागाला सहकार्य करायला सुरुवात केली आहे. या बॉम्बस्फोटांशी संबंधित सर्व बारीकसारीक तपशील उपलब्ध करून दिला जात असून संबंधित दोषींना पकडण्यासाठी सहकार्य केले जात आहे, असे अमेरिकेच्या दूतावासाच्या प्रवक्‍त्या नॅन्सी वॅनहोम यांनी सांगितले आहे.

श्रीलंकेतील बॉम्बस्फोट “नॅशनल तावहीथ जमाथ’या दहशतवादी गटाने केल्याचे म्हटले जात आहे. मात्र या गटाने अद्यापही या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. हे हल्ले स्वीकारल्याचा व्हिडीओ इस्लामिक स्टेटकडून मंगळवारी प्रसिद्ध केला गेला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.