नवी दिल्ली – भारतात सलग सहाव्या दिवशी नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे. प्रभावी चाचण्या, शोध, उपचार, सर्वेक्षण आणि स्पष्ट संदेश याचा हा परिणाम असून पंतप्रधानांनी सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर झालेल्या आढावा बैठकीत यावर भर दिला.
गेल्या 24 तासात देशात 87 हजार रुग्ण बरे झाले तर एकूण 86 हजार जणांना कोविडची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 46 लाख 74 हजार इतकी झाली असून रुग्ण बरे होण्याच्या दराने 81 टक्क्यांचा आकडा पार केला आहे.
नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त झाल्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत वाढत आहे. बरे झालेले रुग्ण 46 लाख 74 हजाराहून अधिक तर सक्रिय रुग्ण 9 लाख 66 हजारांइतके आहेत.
या दोन्हीतील तफावत 37 लाखांनी जास्त आहे. तसेच सक्रिय रुग्णसंख्या एकूण बाधित रुग्णांच्या 16 टक्के इतकी आहे. सक्रिय रुग्णसंख्येत हळूहळू घट दिसून येत आहे.
राष्ट्रीय स्तरानंतर 13 राज्यातही नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 74 टक्के 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्रात 19 हजार 476 रुग्णसंख्येच्या आधारे सलग सहाव्या दिवशी हे प्रमाण कायम ठेवले आहे.