पुणे ते मुंबई प्रवास आणखी सुपरफास्ट

प्रवासाचा वेळ 35 ते 40 मिनिटांनी होणार कमी
“इंटरसिटी एक्‍स्प्रेस’ला आता पुढे आणि मागे अशी दोन इंजिने

पुणे – मध्य रेल्वेचा पुणे ते मुंबई प्रवास आता आणखी सुपरफास्ट होणार आहे. पुणे ते मुंबई धावणाऱ्या “इंटरसिटी एक्‍स्प्रेस’ला पुढे आणि मागे अशी दोन इंजिन लावून करण्यात आलेली “पुशपूल’ चाचणी यशस्वी ठरली आहे.
मुंबई ते पुणे इंटरसिटी एक्‍स्प्रेस मुंबईवरील सीएसटी स्थानकावरून यापूर्वी सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी सुटत होती. तीच गाडी आता सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी सुटणार आहे.

ही गाडी यापूर्वी सकाळी 9 वाजून 57 मिनिटांनी पुण्याला पोहोचत होती. आता ती सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी पुण्याला पोहोचणार आहे. त्यामुळे ही गाडी पुण्यात पोहोचण्यासाठी किमान 35 ते 40 मिनिटांची बचत होणार आहे. पुण्याहून ही गाडी सायंकाळी 5 वाजून 55 मिनिटांच्या ऐवजी सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी निघणार आहे. विशेष म्हणजे ही गाडी पूर्वीच्याच वेळेत म्हणजेच 9 वाजून 5 मिनिटांनी पोहोचणार आहे. त्यामुळे या वेळेतही 35 मिनिटांची बचत होणार आहे, असे मध्य रेल्वेचे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.