धोका कायम, पुण्यात पुन्हा दीड हजारांवर करोनाबाधित सापडले

गेल्या 24 तासांत करोनामुळे आणखी 33 जणांचा मृत्यू

पुणे – शहरात दोन दिवसांपासून बाधित संख्या दररोज दीड हजारांच्या संख्येने वाढत असून, आजही नव्याने 1 हजार 577 बाधित सापडले आहेत. तर दिवसभरात 1 हजार 427 बाधित करोनामुक्त झाले असून, बरे झालेल्यांची संख्या 65 हजार 346 वर पोहचली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात करोनामुळे 33 जणांचा मृत्युची नोंद झाली आहे.
शहरात दिवसेंदिवस नमुने तपासणी संख्या वाढत असून, शनिवारी (दि. 22) सुट्टीचा दिवस असूनही दिवसभरात 6 हजार 891 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. तर आतापर्यंत तब्बल 3 लाख 97 हजार 927 म्हणजे जवळपास नमुने तपासणीच्या संख्या चार लाखांचा टप्पा पार करत आली आहे. एकूण तपासणीत आतापर्यंत 82 हजार 170 व्यक्तींचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. त्यातील 65 हजार 346 बाधित करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 1 हजार 950 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यःस्थितीत शहरातील विविध रुग्णालयात 14 हजार 874 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 804 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 488 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आले असून, 316 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.