मुंबई – सध्या बिटकॉइनचा दर 90 हजार डॉलरच्या जवळपास आहे. गेल्या महिन्यात झालेल्या गुंतवणुकीमुळे बिटकॉइनचे एकत्रित मूल्य 1.752 लाख कोटी हॉलर इतके झाले आहे. तर चांदीत असलेली एकूण गुंतवणूक 1.726 लाख कोटी डॉलर आहे. त्यामुळे गुंतवणूकीत बिटकॉईनने चांदीला मागे टाकून आठवा क्रमांक गाठला आहे.
पहिल्या क्रमांकावर सोने असून सोन्यातील एकूण गुंतवणूक 17.6 लाख कोटी डॉलर आहे. त्यानंतर दुसर्या क्रमांकावर एनव्हिडिया, तिसर्या क्रमांकावर अॅपल कंपनी, चौथ्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्ट तर पाचव्या क्रमांकावर अल्फाबेट कंपनी आहे. या महिन्यात बिटकॉइनचे मूल्य वाढल्यामुळे आता बिटकॉइनने मेटा, टेस्ला, बार्कशायर हॅथवे या कंपन्यांना मागे टाकले आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांची नियुक्ती झाल्यापासून बिटकॉइनचे दर वेगात वाढत आहेत. यासाठी आवश्यक नियंत्रण व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्पक्रम त्यांनी केलेला आहे. लवकरच बिटकॉइनचा दर एक लाख डॉलरच्या पातळीवर जाऊ शकतो. दरम्यान मायक्रोस्ट्रॅटेजी या कंपनीने काही दिवसांपर्वी 27,200 बिटकॉइन दोन अब्ज डॉलर मोजून खरेदी केले आहेत. त्यामुळेही बिटकॉइनचा दर वाढला आहे. डिसेंबर 2020 मध्येही या कंपनीने 29,646 बिटकॉइन विकत घेतले होते.