पुणे – शहरात सलग दुसऱ्या दिवशी करोना बाधित संख्या दीड हजारांच्या आत नोंदवली गेली आहे. मंगळवारी 1 हजार 364 बाधित नव्याने सापडले. तर, 1,614 करोनामुक्त झाले. तर, करोनामुळे आणखी 46 जणांचा मृत्यू झाला.
मंगळवारी 5 हजार 215 संशयितांची तपासणी करण्यात आली. शहरात सध्या 17 हजार 76 बाधित सक्रिय असून, त्यातील 957 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 492 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे, तर 465 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, सोमवारी प्रशासनाने चाचण्यांची संख्या घटवली होती. शिवाय काही स्वॅब सॅम्पल तपासणीचे बाकी होते. ते दोन्ही तपासून मंगळवारी आलेल्या परिणामांची संख्या आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.