मोदी सरकारनामक सर्कसमध्येच अधिक विदूषक – कॉंग्रेस

मुंबई – महाराष्ट्र सरकारची सर्कस म्हणून खिल्ली उडवणाऱ्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर कॉंग्रेसने जोरदार पलटवार केला. राजनाथ यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मुंबई कॉंग्रेसचे नेते चरणसिंग सप्रा पुढे सरसावले. जनता आपल्याविषयी असंवेदनशील असणारी मोदी सरकारनामक सर्कस पाहत आहे. त्या सर्कशीत विदुषकांची संख्या अधिक आहे.

देशातील करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ती स्थिती साजरी करण्यासाठी भाजप देशभरात व्हर्चुअल निवडणूक सभांचे आयोजन करत आहे. ती सर्कसच नाही काय, असा तिरकस सवाल सप्रा यांनी केला. महाराष्ट्र सरकार करोनाविरोधात निकराने लढत आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.