कार्तिकीनिमित्त जादा बस

पिंपरी – आळंदी येथे कार्तिकी एकादशी व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने “पीएमपी’च्या पिंपरी-चिंचवड शहरातून जवळपास 50 बसेस सोडण्यात येणार आहेत. 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान त्याचे नियोजन करण्यात आली असल्याची माहिती “पीएमपी’च्या वतीने देण्यात आली.

आळंदी येथे राज्यभरातून भाविक येतात. त्यांना प्रवासात अडचण येऊ नये, यासाठी दरवर्षी प्रमाणे पीएमपीच्या वतीने जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने “पीएमपी’ प्रशासनाच्या वतीने आळंदी-देहू सोहळयानिमित्त 211 बसेसचे नियोजन केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून पिंपरी, चिंचवड, निगडी, हिंजवडी, रहाटणी, देहू या ठिकाणाहून जादा बसेस सोडण्यात येणार आहे. या कालावधीत बसच्या चारशे फेऱ्या होणार आहेत. वारजे माळवाडी बसमार्ग क्रमांक 299 वरुन डेक्कन, मनपा विश्रांतवाडी मार्गे आळंदी धावणार आहे. तिथे दहा बसेस सोडण्यात आल्या आहेत.

दरम्यान, भेकराईनगर ते आळंदी या मार्गावर ई-बस सोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्याचाही फायदा होणार आहे. तरी भाविकांनी व शहरातील नागरिकांनी या बसेसचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)