मोरदरा पाझर तलाव 100 टक्‍के भरला

मंचर – मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द गावाला पाणीपुरवठा करणारा मोरदरा पाझर तलाव शंभर टक्‍के भरला आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे.

अवसरी खुर्द हे गाव मोठे आहे. तसेच गावात शासकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय असल्याने अनेक विद्यार्थी येथे वास्तव्यास आहेत. गावाला दररोज लाखो लिटर पाणी लागते. मोरदरा पाझर तलावालगत असलेल्या विहिरीतून पाइपलाइनद्वारे गावातील पाण्याच्या टाकीत पाणी सोडून पाणीपुरवठा केला जातो, परंतु गतवर्षी पाऊस कमी झाल्याने मोरदरा पाझर तलाव अर्धाच भरल्याने मार्च महिन्यात चार दिवसांतून एकदा गावाला पाणीपुरवठा करण्यात आला होता. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने मोरदरा पाझर तलाव 50 टक्के भरला होता. त्यानंतरही पाऊस सुरू राहिल्यामुळे सध्या पाझर तलाव 100 टक्‍के भरल्याने गावचा पाणीप्रश्‍न मार्गी लागला आहे. सध्या गावात दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)