भारतातील बॅंकांची स्थिती सुधारली – मूडीज्‌

नवी दिल्ली – भारतातील बॅंकांची परिस्थिती सुधारली असल्याचे मुडीज्‌ या पतमानांकन संस्थेने म्हटले आहे. या अगोदर भारतीय बॅंकिंग व्यवस्थेबाबत मुडीज्‌चे पतमानांकन नकारात्मक होते.

आता यात बदल करून ते स्थिर असे करण्यात आले आहे. भारतातील बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता आता कमी झाली आहे. त्याचबरोबर भांडवल पुरवठा करण्यासाठी बॅंकाकडे पुरेशा ठेवी असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. यामुळे भारतातील बॅंका आगामी काळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पुरेसा भांडवल पुरवठा करू शकतील असे समजले जात आहे.

त्यामुळेच रिझर्व बॅंकेने भांडवल सुलभतेसह व्याजदर कमी पातळीवर ठेवले आहेत. या कारणामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर यावर्षी आणि पुढच्या वर्षी वाढण्याची शक्‍यता असल्याचे या संस्थेला वाटते. भारताचे पतमानांकनही या संस्थेने आता स्थिर या पातळीवर ठेवले आहेत. भारताला भांडवल आकर्षित करण्यासाठी हा अहवाल सकारात्मक समजला जातो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.