मुंबई : राज्यात मान्सून आल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. मात्र मागच्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. जलसाठ्यांमधली पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. त्यामुळे पाऊस कधी पडणार याकडे सामान्य नागरिकांसह शेतकरी देखील आस लावून बसला आहे.
दरम्यान, हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. तर पुण्यासह राज्यातल्या इतर भागात पाऊस गायब झाला आहे. येत्या चार दिवसात राज्यातल्या काही भागात वादळी वाऱ्यासह, मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. पश्चिम किनार्यावर ऑफ-शोअर ट्रफ आणि पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावाखाली असल्यामुळे राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान आज दिनांक १६ जून रोजी यवतमाळ , गडचिरोली, नागपूर , वर्धा , भंडारा या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, तर अकोला , वाशीम , अमरावती , बुलढाणा या भागात देखील पाऊस हजेरी लावणार आहे.
पश्चिम किनार्यावर ऑफ-शोअर ट्रफ आणि पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावाखाली;
येत्या 5 दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता.
– IMD
4, 5 दिवसांचे इशारे जवळपास सारखेच आहेत. pic.twitter.com/BNNHSNLKv5— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 14, 2022
‘या’ भागात जोरदार पाऊस
किनारपट्टी आंध्र प्रदेश, रायलसीमा, केरळ आणि माहे, दक्षिण आतील कर्नाटकात (SIK) मुसळधार पावसाची शक्यता असून 15-17 दरम्यान तेलंगणा; 15-18 दरम्यान तामिळनाडू; 16-19 दरम्यान किनारपट्टीवरील कर्नाटक; 18-19 जून दक्षिण कोकण आणि गोवा पाऊस जोरदार हजेरी लावेल. अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
15 Jun; पुढील 5 दिवसांत मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये गडगडाटी वादळ / विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
छत्तीसगडमध्ये पुढील 5 दिवसांत मुसळधार पाऊस;
15-17 जून दरम्यान पूर्व मध्य प्रदेशात
19 जून रोजी विदर्भात. https://t.co/qSI9WMJcRH— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 15, 2022