दीर्घ प्रतीक्षेनंतर मान्सूनपूर्व पावसाची पुन्हा दमदार हजेरी

खरीप हंगामासाठी लगबग होणार सुरू : आता चांगल्या मान्सूनची अपेक्षा

चिंबळी – चिंबळी परिसरात रविवारी (दि. 23) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाने समाधान व्यक्‍त केले असले तरी तो मान्सून पावसाच्या प्रतिक्षेत आहे. तर रविवारच्या पावसामुळे चिंबळी परिसरात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली. 15 दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावाने हजेरी लावल्यनंतर अचानक दडी मारल्याने खरीप हंगामातील पेरणी खोळंबळी होती. त्यामुळे यंदा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्‍यता व्यक्‍त होत होती. मात्र, पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सोमश्‍वरनगर (ता. बारामती) परिसरात रविवारी (दि. 9) मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर तब्बल 15 दिवसांनी म्हणजेच रविवारी (दि. 23) सायंकाळी साडेचारच्या सुमारास पावसाने मान्सूनपूर्व पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने परिसरात काहीकाळ थंड वातावरण झाले होते. बळीराजा मान्सूनपूर्व पावसाने समाधी असला तरी तो मान्सून पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बारामती तालुक्‍यातील शेतकरी, नागरिक चिंताग्रस्त झाले होते. त्यात शनिवारी (दि. 22) आर्द्रा नक्षात्राला प्रारंभ झाल्याने या नक्षावर बळीराजाची भिस्त असून रविवारी मान्सूनपूर्व पावसाने जरी हजेरी लावली असली तरी बळीराजाचे मान्सून पावसाकडे डोळे लागले आहे. रविवार निंबुत, वाणेवाडी, मुरूम, वाघाळवाडी, करंजे, सोमेश्‍वर, मुर्टी, चौधरवाडी, वाकी, सोरटेवाडी, होळ येथे पाऊस बरसल्याने बळीराजाने समाधान व्यक्‍त केले. गेल्या 15 दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यातच केवळ ऊन, सावलीचा खेळ सुरू असल्याने बळीराजा हताश झाला होता. दरम्यान, आज झालेल्या पावसामुळे काही भागात वीज प्रवाह खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले होते. तर दरमदार पावसामुळे सोमेश्‍वरनगर परिसरतील रस्त्यालगत पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचले आहे.

ऊस पिकास फायदा
मान्सून पूर्व पावसाने रविवारी हजेरी लावल्याने परिसरतील शेतीच्या कामांसाठी मदत होणार असून तरकारी पिकांचे या पावसाने नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्‍यता आहे. मात्र, या पावसाचा ऊस पिकांसह इतर पिकांना याचा फायदा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.