औंध, दि. 31 -विद्यांचल हायस्कूल येथे 14 वी मान्सून पुणे चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली. शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यानिमित्त इयत्ता 5 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना चित्रातून व्यक्त होण्याची संधी मिळाली.
शाळेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाला अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन अशोक मुरकुटे, संस्थेचे सदस्य भालचंद्र मुरकुटे, श्वेता मुरकुटे, योगिता बहिरट उपस्थित होत्या. तसेच परीक्षक म्हणून भीमसेन सीताराम महागावकर व प्रकाश पवार उपस्थित होते. तीन गटांत झालेल्या या स्पर्धेत 15 शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले.
स्पर्धेचा निकाल : गट-अ : प्रथम : रितीका पत्की, अभिनव इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल. गट-ब : प्रथम : स्वर्णा थोटा जीके गुरुकुल स्कूल. गट-क : प्रथम : अथर्व घाटगे, ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल