पुणे -नैऋत्य मोसमी पाऊस जुलैमध्येहीसामान्य राहण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) गुरुवारी सांगितले. या अंदाजानुसार जुलैच्या दुसऱ्या आठवड्याच्या उत्तरार्धात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने यावर्षीपासून दरमहा पावसाचा दीर्घकालीन अंदाज देण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी जुलैमध्ये देशातील पावसाची स्थिती काय असेल, याबाबत गुरूवारी माहिती देण्यात आली. विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा म्हणाले, “जुलैमध्ये संपूर्ण देशभरात पाऊस सामान्य (दीर्घ कालावधी सरासरीच्या 94 ते 106 टक्के) राहण्याची शक्यता आहे.
सध्या बंगालच्या उपसागरापासून खालच्या उष्ण कटिबंधीय पातळीवर वाहणारे वारे 7 जुलैपूर्वी उत्तर-पश्चिम मैदानावर स्थापित होण्याची शक्यता नाही. त्याचबरोबर पाकिस्तानकडून वायव्य / नैऋत्य कोरडे वारे पश्चिमेकडे खालच्या पातळीवर वाहू लागल्यामुळे, पंजाब, हरियाणा, चंदिगड आणि दिल्ली, उत्तर राजस्थान, उत्तर प्रदेश आणि वायव्य मध्य प्रदेशात काही ठिकाणी असलेल्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. येत्या दोन दिवसांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.’