पुण्यात मान्सूनची दमदार सलामी

दुपारनंतर शहारात पावसाची रिपरिप : नागरिक चिंब

पुणे – चातकासारखी वाट पाहणाऱ्या पुणेकरांना अखेर सोमवारी वरुणराजाने तृप्त केले. सकाळपासूनच पावसाने विविध भागांत हजेरी लावली, तर शहरात दुपारीदेखील सलग दोन तास पाऊस झाला. दरम्यान, पुढील दोन दिवस पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाल्यानंतर पावसाने राज्याचा बहुतांश भाग व्यापला आहे. मागील दोन दिवसात शहरात दुपारनंतर पावसाच्या हलक्‍या सरी पडत आहे. सोमवारी (दि.24) दुपारी ढग दाटून आल्यामुळे जोराचा पाऊस येणार असे वाटत होते. साधारण साडेतीन वाजता पावसाला सुरुवात झाली. संततधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने डेक्कन, लक्ष्मीरोड, कर्वे रस्ता, संचेती चौक यासह शहरातील अन्य ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

कोथरूड, वारजे, औंध, येरवडा, विश्रांतवाडी, हडपसर, कात्रज या भागातही पाऊस झाला. यावेळी झाडपडीच्या किरकोळ घटना घडल्या. मात्र, पौड रस्त्यावरील कचरा डेपो याठिकाणी रस्ता निसरडा झाल्यामुळे वाहने घसरत असल्याचा घटना समोर आल्या. पावसामुळे मागील चार दिवसांत कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. दुपारचा उन्हाचा चटकाही कमी झाला असून, पावसाचा आनंद घेण्यासाठी मुले मनसोक्त भिजण्याचा आनंद घेताना दिसले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.