6 जूनपर्यंत मॉन्सून केरळात!

हवामान खात्याने वर्तवला अंदाज

पुणे – अंदमान-निकोबरमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल सुरू आहे. 6 जूनपर्यंत मॉन्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

20 मे रोजी मान्सून हा अंदमान-निकोबरमधील निकोबार बेटांवर दाखल झाला. त्यानंतर तो अंदमानच्या काही बेटांवरील भागात दाखल होण्याची शक्‍यता होती; पण अनुकूल स्थिती नसल्याने तो पुढे सरकला नाही. पण आता स्थिती निर्माण झाल्याने येत्या 48 तासांत मान्सून उर्वरित भागात सुद्धा दाखल होईल असा अंदाज आहे.

अंदमानात दाखल होण्यासाठी सुद्धा मान्सूनने यंदा विलंब लावला आहे. साधारणतः 18 ते 19 मे दरम्यान मान्सून याठिकाणी दाखल होतो; पण यंदा अद्यापही दाखल झालेला नाही. यंदा मान्सून केरळात सुद्धा उशिराने दाखल होणार आहे. 6 जूनच्या आसपास तो केरळात येईल. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा मान्सून उशिराच बरसणार असल्याचे संकेत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×