थिरूनंतपूरम – केरळात उद्या 11 जुलै रोजी कन्नुर आणि कासरगोड या दोन जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला असून तेथे त्यानुसार रेड ऍलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच केरळातील वायनाड, कोझीकोडे, मल्लापूरम या जिल्ह्यांमध्येही तुफानी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून तेथे ऑरेंज ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. पल्लकड, त्रिसुर, इडुक्की, आणि एर्नाकुलम या जिल्ह्यांमध्ये यलो ऍलर्ट जारी करण्यात आला आहे.
थिरूनंतपूरम, कोल्लम आणि पथनमथिट्टा या जिल्ह्यांमध्येही तुफानी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने तेथेही धोक्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. केरळात सध्याही जोरदार पाऊस सर्वत्र पडत आहे. कोट्टयम जिल्ह्यात 15 सेंटीमिटर इतक्या पावसाची नोंद आज सकाळी दहा वाजेपर्यंत झाली. तर एर्नाकुलम जिल्ह्यात सुमारे 11 सेंटीमिटर इतका पाऊस झाला.