मान्सूनचे केरळमधील आगमन आणखी दोन दिवस लांबणीवर

पुणे – नैऋत्य मोसमी पावसाचे केरळमधील आगमन पुन्हा दोन दिवस लांबणीवर गेले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून दि. 8 जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे. बुधवारी (दि. 5) मान्सूनने श्रीलंकेचा काही भाग व्यापला असून, त्याचा प्रवास अजूनही अडखळत सुरू आहे. दरम्यान, राज्यात पूर्वमोसमी पाऊस पडत असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कमाल तापमानात घट झाली आहे. मान्सूनने दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीव, कोमोरिन बेटांचा भाग व्यापला आहे.

18 मे रोजी मान्सूनचे अंदमानात आगमन झाल्यानंतर, आतापर्यंतचा मान्सूनचा प्रवास अडखळतच सुरू आहे. दरम्यान, राज्यात पूर्वमौसमी पाऊस पडत असल्यामुळे वातावरणात बदल होत आहे. कर्जत येथे 10 मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील परांडा येथे 20, तर बीड आणि परभणी येथे प्रत्येकी 10 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.