बॉलिवूड अभिनेत्री मॉनी रॉय आपल्या लुक्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मॉनीच्या लुकचे हजारोंहून अधिक चाहते आहेत. सध्या मॉनीचा लुक जरा बदलल्यासारखा वाट असून तिने प्लॉस्टिक सर्जरी केली आहे. त्यानंतर मॉनीने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून तो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.
मॉनी रॉयने आपल्या इंस्टाग्रावर एक सुंदर असा फोटो शेअर केला आहे. व्हाईट टॉपमध्ये तीने आपले केस मोकळे सोडले असून या लुकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. मॉनीच्या या फोटोला चाहत्यांकडून वाह-वाह मिळत असून अनेक जणांनी कॉमेन्ट्स करत मॉनीची स्तुती केली आहे.
छोट्या पडद्यावरील “नागिन’ मालिकेतून आपली ओळख निर्माण करणारी मॉनी रॉयने 2018मध्ये “गोल्ड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत झळकली होती. मॉनी सोशल मीडियावरही ऍक्टिव असते आणि सतत आपले फोटो शेअर करत असती.
दरम्यान, काही वेळा तिला ट्रोलर्सचाही सामना करावा लागलेला आहे. पण तिला याचा काहीही फरक पडत नाही आणि ती कोणाचीही परवा न करता आपले अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.