दुप्पट पैसे मिळणारी पोस्टाची ‘ही’ योजना तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

Post Office Best scheme – पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये केलेली गुंतवणूक सर्वात सुरक्षित समजली जाते. अनेकजण इतर ठिकाणी गुंतवणूक करण्यापेक्षा पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवतात. तुम्हीही गुंतवणूक करू इच्छित असाल तर पोस्ट ऑफिसच्या ‘किसान विकास पत्र’ (KVP) योजनेत करू शकता.

किसान विकास पत्र ही योजना भारत सरकारकडून (Indian Government) जारी करण्यात येणारी वन टाइम इनव्हेस्टमेंट (one Time Investment) योजना आहे. या योजनेत तुम्हाला प्रत्येक महिन्याला, तिन महिन्याला किंवा सहा महिन्याला किंवा प्रत्येक वर्षाला गुंतवणूक करता येत नाही. यात तुम्हाला एकाच वेळी गुंतवणूक करावी लागते. ही योजना देशातील सर्व पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बॅंकांमध्ये उपलब्ध आहे.

किसान विकास पत्र योजनेतील गुंतवणूकदारांना परिपक्वता कालावधीनंतर (Maturity Period) गुंतवलेली रक्कम दुप्पट परत मिळते. या योजनेत कमित कमी 1000 रूपये गुंतवावे लागतात. तसेच गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाहीए. तुम्ही कितीही पैसे गुंतवू शकता. ही योजना विशेषकरून शेतकऱ्यांसाठी तयार केलेली आहे. यात गुंतवणूक करून ते दीर्घ मुदतीच्या आधारावर त्यांचे पैसे वाचवू शकतात.

पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या योजनेचा मुदतपूर्ती कालावधी 124 महिने म्हणजेच 10 वर्षे 4 महिने आहे. म्हणजेच आपण किसान विकास पत्रात गुंतवणूक केल्यास आपली रक्कम 124 महिन्यांत दुप्पट होईल. योजनेत गुंतवलेल्या रकमेवरील मिळणाऱ्या व्याजाने गुंतवलेली रक्कम दुप्पट होते.

जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर या योजनेच्या बदल्यात तुम्हाला अगदी अल्प अटींसह केव्हीपीएसवर (KVPS) कर्ज मिळेल. तसेच व्याजही कमी लागते. जर आपण आर्थिक संकटात असाल आणि आपण या योजनेत गुंतवणूक केली असेल तर आपल्याला सहज कर्ज मिळेल. अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.