दर्ग्यातील दानपेटीतील पैसे चोरणाऱ्यास अटक

पुणे – कोथरूड परिसरातील दर्ग्यातील दानपेटीतील पैसे चोरी करणाऱ्याला फरासखाना पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केले. आरोपी शिफ्टवर रिक्षा चालवत असून कर्जबाजारी असल्याने चोरी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

दिपक दत्तात्रय जाधव (42) असे आरोपीचे नाव आहे. तो कोथरूड येथील एका दर्ग्यामध्ये गेला होता. तेव्हा दर्शन घेतल्यावर त्याने आजूबाजूला कोणी नसल्याचे बघून दानपेटीतील पैसे चोरले होते. त्याची ही करामत सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली होती. फरासखाना पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी शंकर कुंभार यांना दर्ग्यातून पैसे चोरी करून एक चोर बुधवार पेठेत रिक्षा घेऊन थांबल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची खबर देऊन सापळा रचला. त्याला रिक्षामध्ये संशयास्पदरित्या थांबलेला असताना बुधवार पेठेत पकडण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दत्तात्रय हा शिफ्टवर रिक्षा चालवतो, तो सध्या कर्जबाजारी असल्याचे सांगत आहे. या टेन्शनमध्ये तो दर्ग्यामध्ये गेला होता. तेथे कोणीच नसल्याचे बघून त्याने दान पेटीवर हात मारला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. दर्ग्यातील प्रशासनाने हे फुटेज पोलिसांना पाठवले होते. या फुटेजचा वापर त्याला जेरबंद करण्यास झाला. ही कारवाई फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नानवदे, पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील व पोलीस कर्मचारी शंकर कुंभार, महादेव वलटे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)