पुणे-मुंबई रेल्वे प्रवासासह लुटा निसर्गाचा आनंद
पुणे – लोणावळा-खंडाळा येथील निसर्गसौंदर्य, पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर असणारे अनेक धबधबे, बोगदे, माथेरानचा डोंगर, सोनगीर हिल, उल्हास नदी, उल्हास व्हॅली अशी निसर्गसौंदर्याने नटलेली ठिकाणे पाहण्याचा आनंद रेल्वे प्रवाशांना घेता येणार आहे. पुणे-मुंबई मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत विशेष डेक्कन एक्स्प्रेस ही आता “विस्टाडोम कोच’सह सेवेत येत आहे, तर या ट्रेनला सर्वसामान्य प्रवासी डबेदेखील असतील.
प्रवास कधीपासून?
दि.26 जूनपासून हा कोच जोडला जाईल. फक्त कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच या रेल्वेने प्रवास करता येणार.
“जनशताब्दी’ला मिळतोय प्रचंड प्रतिसाद
“विस्टाडोम कोच’सह रेल्वेसेवा सध्या मुंबई-मडगाव जनशताब्दी विशेष ट्रेनमध्ये जोडलेला आहे. त्याला प्रवासी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
अशी आहे बोगी
“विस्टाडोम’ बोगीत मोठ्या खिडक्या आणि काचेचे छप्पर. राउंड शेप आणि पुशबॅक सुविधांच्या खुर्च्या, संपूूर्ण वातानुकूलित, स्वच्छता आणि टापटीपपणा.
येथे थांबणार
दादर ठाणे कल्याण नेरळ लोणावळा तळेगाव खडकी शिवाजीनगर
वेळापत्रक
सकाळी 7 वा.
ट्रेन नं. 01007 सीएसएमटी मुंबई-पुणे
दुपारी 3.15 वा
ट्रेन नं. 01008
पुणे-सीएसएमटी मुंबई
बुकिंग :
या विशेष ट्रेनचे सामान्य शुल्कासह बुकिंग सर्व पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसी संकेतस्थळावर 24 जून रोजी सुरू होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.