मुंबई – देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातलेआहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून मृत्यूंची संख्या वाढली आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटामध्ये आजूबाजूला अनेक हृदयपिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झलाय.
या फोटोमध्ये एक गृहिणी ऑक्सीजन सपोर्टवर असूनही स्वयंपाक घरात पोळ्या लाटताना दिसत आहे. घरातल्या आईला कधीही सुट्टी नसते असं चित्रच या फोटोमधून दिसून येत आहे.
I am raising funds for families affected by Covid-19 wherein the breadwinner has been affected. You’ll donate directly to the family. Many are unable to pay fees as well.
I ll be sending you a song video in return.— Chinmayi Sripaada (@Chinmayi) May 7, 2021
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोवरून सध्या नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी, हे प्रेम नसून, ही सामाजिक रचनेच्या नावावर गुलामी आहे. असं म्हणत या फोटोवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तर दुसरीकडे महिलेच्या कुटुंबाप्रति प्रेमाचे गोडवे गाताना घर, कुटुंब करिअर अशा सगळ्या पातळ्यांवर लढणाऱ्या आईला कधीच सुट्टी नसते. अशा भावुक कमेंट्स नेटकरी देतायेत.
या फोटोला प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदाने सुद्धा प्रतिक्रिया दिली. तिने फोटो शेअर करत, ‘महिलांना आराम न करण्यास भाग पाडणार्या या निस्वार्थ प्रेमाचे सत्र थांबू शकते का?’ असा प्रश्न उपस्थित केला.
दरम्यान, या फोटोची सत्यता पडताळण्यात आली नसल्याने काही नेटकऱ्यांनी या फोटोच्या सत्येतेवर प्रश्न उपस्थित केले आहे.