अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पाथर्डी – रवंडी येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंगाचा प्रकार शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ मुलीच्या मदतीला धावले. अकुंश नारायण चव्हाण (रा. कवणा, ता. हातगाव.जि. नांदेड) या नराधमाला पकडून चांगलाच चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले. खरवंडी गावात घराशेजारी शेळी चारण्यासाठी अल्पवयीन मुलगी शेतात गेली. रस्त्याच्या बाजूला शेळी चारीत असताना, दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अंकुश चव्हाण मोटरसायकलवरुन उतरुन मुलीकडे आला.

तुमची शेळी विकायची का असे मुलीला विचारले. तेव्हा शेळी विकायची नाही असे मुलीने सांगितले. मात्र चव्हाण मुलीकडे धावत आला. त्याने मुलीच्या अंगावरील कपडेदेखील फाडले. मुलगी व चव्हाण यांची झटापट पाहुन शेळी घराकडे पळाली. शेळी घराकडे आली, आणि मुलगी का आली नाही, म्हणून मुलीच्या आईने तिच्या वडिलांना मुलीला पहा असे सांगितले. तेव्हा वडील शेताकडे पळाले, तर एकजण पळताना दिसला. मुलीने रडतच घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. आरडा-ओरडा झाल्याने राजेंद्र जगताप, दत्ता माताडे व रामनाथ माताडे मदतीला धावले. त्यांनी चव्हाणला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.