पुणे – पार्सल देण्यासाठी घरी आलेल्या डिलिव्हरी बॉयने घरात एकट्या असलेल्या १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला आहे. ही घटना वाघोली येथे घडली असून, याप्रकरणी आरोपीला वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एका ३९ वर्षांच्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी मागविलेले पार्सल देण्यासाठी डिलिव्हरी बॉय घरी आला होता. तेव्हा त्यांची मुलगी घरी एकटीच होती. तिने फिर्यादीला फोन केल्यावर फिर्यादीने पार्सलचे १०० रुपये देण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीकडे पिण्यासाठी पाणी मागितले. तिने पाणी दिल्यावर त्याने मुलीच्या अंगावरून हात फिरवून विनयभंग केला.
त्यानंतर स्वत:चे कपडे काढत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरडाओरडा केल्यावर त्याने तिच्या हातात शंभर रुपये ठेवून मम्मीला काही सांगू नको, असे सांगत पळ काढला. या प्रकरणाचा तपास वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड करत आहेत.