कोल्हापूर: जबाब देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी चेतन घाडगे याला अटक करण्यात आली. कलम 354 आणि पोक्सो अंतर्गत घाडगेवर कारवाई करण्यात आली आहे. जबाब देताना संबंधित मुलीच्या पाठीवरून हात फिरवणे आणि विशिष्ट भाषेत बोलल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला. ड्युटीवर असतानाच पोलिसांनी केलं अटक असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास सुरु आहे. या प्रकरणात पोलीस स्टेशन अंतर्गत वाद असल्याची चर्चा कोल्हापुरात सुरु आहे.