पिंपरी, (प्रतिनिधी) – एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग ५५ वर्षीय प्रौढाने केला. ही घटना पिंपरीतील नेहरूनगर भागात २१ जून रोजी घडली. ब्रिजपाल मुकुद सिंग (वय ५५, रा. उद्यमनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत १५ वर्षीय मुलीने मंगळवारी (दि. २५) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी येत होती.
त्यावेळी आरोपी ब्रिजपाल याने तिचा पाठलाग केला. तिचा हात धरून चल मी तुला खूश करतो, असे म्हणत तिचा विनयभंग केला. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.