मंचर – शिंदेवाडी (ता. खेड) येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे, अशी माहिती घोडेगावचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली. मनिष उर्फ बट्ट्या श्रीधर काळे असे कारागृहात रवानगी करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, श्रीधर काळेच्या दुकानात अल्पवयीन मुलगी खरेदीसाठी आली असता त्याने तिचा हात धरला आणि पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याबाबत पीडितेच्या वडिलांनी काळेला जाब विचारला असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे करीत आहेत.