सासू-सुनेच्या नात्यातील ओलावा ! सोलापुरात सासूच्या पार्थिवाला सुनांनी दिला खांदा

सोलापूर – अनेक कुटुंबात सासू आणि सूनांचे वाद होतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच हैराण होते. वाहिण्यांवरच्या मालिकांमध्ये देखील सासू-सूनेतील मतभेद मसाना लावून दाखविण्यात येतात. मात्र सोलापूर जिल्ह्यातील सासू-सुनांच्या नात्यातील आपुलकीने याला छेद दिला आहे.

 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील दमयंती मुंढे यांचे बुधवारी (4 ऑगस्ट रोजी) वयाच्या 70 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. यावेळी परंपरेला छेद देत सासुबाईंच्या पार्थिवाला दमयंती मुंडे यांच्या चार सुनांनी खांदा दिला.

 

मयत दमयंती मुंडे यांनी चारही सुना अनिता यशवंत मुंढे, वैशाली जयवंत मुंढे, अर्चना गुणवंत मुंडे आणि मनोरमा बळवंत मुंडे यांना कायम मुलींप्रमाणे प्रेम अन् माया दिली. सुनांनी देखील आपल्या सासूबाईंची अखेरच्या काळात संपूर्ण काळजी घेतली.  त्यामुळे सूना आणि सासू यांच्यातील नातं हे मुली आणि आईप्रमाणेच होतं. हे नातं शेवटपर्यंत कायम राहिलं.

 

अंत्ययात्रेत खांदा देण्यासाठी सूना समोर आल्या. सासरे आणि दमयंती यांचे पती कारभारी मुंडे शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांनी देखील या बदलाला पाठिंबा दर्शविला. सूनांव्यतिरिक्त दमयंती यांचे भाऊ चंद्रकांत, हरिश्चंद्र आणि संभाजी  तर मुले यशवंत, जयवंत आणि बळवंत यांनी देखील खांदा दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.